समृद्धी महामार्ग : शेतकऱ्यांचा जमीन संपादनाला विरोध
By Admin | Updated: July 26, 2016 22:09 IST2016-07-26T22:09:29+5:302016-07-26T22:09:29+5:30
बैठकीवर बहिष्कार

समृद्धी महामार्ग : शेतकऱ्यांचा जमीन संपादनाला विरोध
बेलगाव कुऱ्हे : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी इगतपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी संपादित होणार असल्याने आज धामणगाव येथे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी बैठक आयोजित केली होती; मात्र पुनर्वसनाला प्रखर विरोध करीत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी जमीन संपादित करू न देण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या आयोजित बैठकीवर आज सर्वच शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला.
दरम्यान, समृद्धी महामार्ग याच तालुक्यातून जात असून, आताही अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शासन गांभीर्यपूर्वक शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत नसल्याने शेतकऱ्यांनी या बैठकीत शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, बाळासाहेब गाढवे, कचरू डुकरे, मधू कोकणे, सुनील वाजे, संपत काळे, नंदू गाढवे, दत्तू जुंद्रे, संपत रोंगटे, ज्ञानेश्वर फोकने, वसंत भोसले, भास्कर बोराडे, किसन रोंगटे, पंढरीनाथ वारु ंगसे, संपत टोचे, संदीप जाधव, पांडुरंग वाघ आदि शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)