मिळकतींचा नमुना सर्व्हे
By Admin | Updated: February 5, 2016 23:03 IST2016-02-05T22:59:11+5:302016-02-05T23:03:58+5:30
सिडकोतील भागांचा समावेश : उद्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमार्फत तपासणी

मिळकतींचा नमुना सर्व्हे
नाशिक : घरपट्टीच्या उत्पन्नातील गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरच मिळकतींचा सर्व्हे होणार आहे, परंतु त्यापूर्वी येत्या रविवारी (दि.७) सिडको विभागातील ठरावीक भागात प्रायोगिक तत्त्वावर नमुना सर्व्हे केला जाणार असून, त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे मुख्य सर्व्हेचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे आणि घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर सर्वेक्षणाचे काम आव्हानात्मक असल्याने आणि खासगी एजन्सींमार्फत होणाऱ्या सर्वेक्षणाचा अनुभव चांगला नसल्याने महापालिकेने प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर नमुना सर्व्हे करण्याचे ठरविले आहे.