माळेगावला महेंद्र सांगळे, सोनारीत संपत शिंदे विजयी

By Admin | Updated: April 18, 2016 22:44 IST2016-04-18T22:36:40+5:302016-04-18T22:44:52+5:30

ग्रामपंचायत पोटनिवडणूक : पांगरीत सालके बिनविरोध

Sampat Shinde won the gold medal in Mahendra Sangale of Malegaon | माळेगावला महेंद्र सांगळे, सोनारीत संपत शिंदे विजयी

माळेगावला महेंद्र सांगळे, सोनारीत संपत शिंदे विजयी

 सिन्नर : तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत महेंद्र निवृत्ती सांगळे, तर सोनारी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत संपत चंद्रभान शिंदे यांनी विजय मिळविला. पांगरी खुर्द ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कुसूम रामनाथ सालके बिनविरोध निवडणूक आल्या.
तालुक्यातील माळेगाव-सोनारी ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. पांगरी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा अर्जुन सालके यांचे निधन झाल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या जागी कुसूम रामनाथ सालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोनारी- येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य गंगाधर आनंदा शिंदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी मतदान घेण्यात आले. त्यात शरद रुंजा शिंदे यांना २२९, संपत चंद्रभान शिंदे यांना २३१ मते मिळाली. चुरशीच्या निवडणुकीत संपत शिंदे यांनी शरद शिंदे यांचा दोन मतांनी पराभव केला. (वार्ताहर)माळेगावला विजयी उमेदवार महेंद्र सांगळे यांचा सत्कार करताना सचिन ठाकरे, समवेत भाऊसाहेब शिंदे, सोमनाथ भिसे, राजेंद्र कपोते, सुनील केकाण आदि.

Web Title: Sampat Shinde won the gold medal in Mahendra Sangale of Malegaon