श्रावणात पंचायत राज समितीला ‘सामिष’ भोजनाची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:36+5:302021-08-27T04:19:36+5:30
या समितीच्या कामकाजास गुरुवारी (दि. २६) सुरुवात करण्यात आली. सकाळचा नाश्टा शासकीय विश्रामगृहात, तर जिल्हा परिषदेच्या आवारात देखील ब्रेकफास्टसाठी ...

श्रावणात पंचायत राज समितीला ‘सामिष’ भोजनाची मेजवानी
या समितीच्या कामकाजास गुरुवारी (दि. २६) सुरुवात करण्यात आली. सकाळचा नाश्टा शासकीय विश्रामगृहात, तर जिल्हा परिषदेच्या आवारात देखील ब्रेकफास्टसाठी स्वतंत्र केटरर्सची नेमणूक करण्यात आली आहे. दुपारचे भोजन विश्रामगृहावर ठेवण्यात आले. त्यात ड्रायफ्रूट हलवा, भरलेली भेंडी, आदी शाकाहारी पदार्थांबरोबरच चिकन मराठासारख्या सामिष पदार्थांचाही समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे श्रावण महिना सुरू असतानाही व त्यातल्या त्यात गुरुवारसारख्या धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या दिवसातही भोजन समितीने समिती सदस्यांना भ्रष्ट करण्याचे पातक केले आहे.
चौकट====
रात्रीचे भोजन अध्यक्षांकडून
गुरुवारी दुपारच्या भोजनाची जिल्हा परिषद प्रशासनाने ठेप ठेवल्यानंतर रात्रीच्या भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी स्वत:कडे घेतली. तसे निमंत्रणही त्यांनी प्रत्येक सदस्यांना लिखित स्वरूपात दिले. शासकीय विश्रामगृहातच ही व्यवस्था करण्यात आली. या रात्रीच्या भोजनात नेमके काय होते हे कळू शकले नसले तरी दिवसा सामिष भोजन चालत असेल तर रात्री त्यापेक्षा काही वेगळे असण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले.