एकाच दिवशी दोन घरफोड्या
By Admin | Updated: August 12, 2016 22:16 IST2016-08-12T22:15:52+5:302016-08-12T22:16:10+5:30
घोटीत चोऱ्यांचे सत्र : तीन लाखांचा ऐवज लंपास

एकाच दिवशी दोन घरफोड्या
घोटी : शहरातील दोन घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सुमारे वीस तोळे सोन्यासह रोख रक्कम व मोबाइल फोन व सीडी प्लेअर असा दोन लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
घोटी पोस्ट कार्यालयातून चार लाख रुपयांची रक्कम चोरी होऊन दोनच दिवस झाले असताना व या चोरीचाच उलगडा अद्याप झालेला नसताना पुन्हा एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
घोटी शहरातील
दुर्गानगर येथील काळू लक्ष्मण यादव हे भात आवणीसाठी कुटुंबासह गावी गेले असताना घराला कुलूप असल्याची संधी साधून घराचा कडीकोयंडे तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले पंधरा तोळे सोने व चाळीस हजार रुपये व इतर साहित्य असा दोन लाख ५९ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दोनच दिवसांपूर्वी घोटी पोस्ट कार्यालयात चोरी होऊन चार लाख रुपये लंपास झाले होते, तर काल एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
शहरातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.२२
(वाताहर)