संभाजी विकास सोसायटी निवडणूक; बारा जागांकरिता ४७ उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: October 13, 2015 22:07 IST2015-10-13T21:56:47+5:302015-10-13T22:07:13+5:30
दोन पॅनलमध्ये लढत : लोकशाही विकास, शेतकरी विकासची निर्मिती

संभाजी विकास सोसायटी निवडणूक; बारा जागांकरिता ४७ उमेदवारी अर्ज
नवी बेज : कळवण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या संभाजी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडीची चर्चा निष्फळ ठरली असून, लोकशाही विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनलची निर्मिती होऊन निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी धनंजय पवार यांच्या उमेदवारीचा ठराव याच विविध कार्यकारी सोसायटीमधून होत असल्याने या सोसायटीच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी निर्माण झालेल्या शेतकरी विकास पॅनलमध्ये चिंधा खैरनार, विनोद खैरनार, दीपक खैरनार, माणिक देवरे, नितीन निकुंभ, मधुकर वाघ, निंबा वाघ, विश्वनाथ अहिरराव, महिला राखीव- मखबलाबाई खैरनार, साखरबाई बच्छाव, इतर मागासवर्गीय- चंद्रकांत पवार, अनु. जाती-जमाती गटातून मधुकर गांगुर्डे यांचा समावेश आहे, तर लोकशाही विकास पॅनलमध्ये जनरल गटात यादवराव पवार, अॅड. भाऊसाहेब पवार, योगेश खैरनार, योगेश वाघ, पोपट खैरनार, निंबा दोधू, केशव बोरसे, केदा जगताप, महिला राखीव गटातून रंजनाबाई पवार, रेखाबाई गांगुर्डे, इतर मागासवर्गीय- गोरख खैरनार, अनु. जाती-जमाती- दामू गांगुर्डे यांचा समावेश असून, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटाच्या जागा निरंक आहेत. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व जिल्हा बँक संचालक धनंजय पवार करीत आहेत, तर लोकशाही विकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच अशोक पवार, अॅड. भाऊसाहेब पवार, माजी वसाका संचालक बाजीराव पवार, कॉ. शिवाजी वळीकर, कॉ. निंबा पगारे, मधुकर वाघ, प्रवीण गांगुर्डे आदि करीत आहेत. विरोधी पॅनल तयारच होऊ शकत नाही अशी चर्चा असताना, एक तुल्यबळ पॅनल तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश देवघरे, सहायक म्हणून रामदास बहिरम काम पाहत आहेत. (वार्ताहर)