संभाजी पवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 23:30 IST2016-02-23T22:53:39+5:302016-02-23T23:30:41+5:30
येवला : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन पंचवार्षिक निवडणूक

संभाजी पवार बिनविरोध
येवला : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर येवला तालुक्यातील तब्बल आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने संभाजी पवार यांची मजूर फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मजूर फेडरेशनची निवडणूक दुरंगी लढतीचे चित्र निर्माण केले गेले होते.
माणिकराव शिंदे, पंकज पारख, अरु ण थोरात या तिघांनी महत्त्वपूर्ण मध्यस्थाची भूमिका निभावून माजी आमदार मारोतराव पवार व आमदार छगन भुजबळ यांच्यात भ्रमणध्वनीवर समन्वय घडवून आणला. या घडामोडीत मागील निवडणुकीचाही संदर्भ देत संभाजी पवार या विद्यमान संचालकास तत्कालीन परिस्थितीत थांबवून गोरख शिंदे यांना बिनविरोध संधी दिली होती.
यावेळेस संभाजी पवार यांना संधी द्यावी अशी भूमिका माजी आमदार मारोतराव पवार यांनी व्यक्त केली. या बैठकीस प्रकाश वाघ, संतु पा. झांबरे, बाळासाहेब गुंड, मुश्ताक शेख, अकबर शहा, निसार निंबुवाले, मोहन शेलार, विजूनाना खोकले, श्याम बावचे, रवि जगताप, दीपक देशमुख, गोरख शिंदे, भाऊसाहेब धनवटे, नाना गुंजाळ, लहानु शिंदे, सुनील पैठणकर, प्रवीण गायकवाड, नितीन आहेर, अनिल दारुंटे, विष्णू कऱ्हेकर, गोटू मांजरे, दिलीप पवार, भूषण लाघवे, अरु ण काळे, देवचंद आप्पा गायकवाड, जगन मुंढे, अशोक मेंगाणे, लहानू शिंदे, संजय बनकर, सुनील काबरा, मुशरीफ शहा आदि पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. (वार्ताहर)