संभाजी पवार मातोश्रीवर

By Admin | Updated: June 12, 2014 00:45 IST2014-06-12T00:34:55+5:302014-06-12T00:45:28+5:30

माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे व माजी पंचायत समिती सभापती संभाजी पवार यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

Sambhaji Pawar Matoshri | संभाजी पवार मातोश्रीवर

संभाजी पवार मातोश्रीवर

 

नाशिक : लोकसभा निवडणुकीत पराभवाने पिच्छा पुरविलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसपुढील अडचणी संपण्याची चिन्हे नसून शरद पवार यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे व माजी पंचायत समिती सभापती संभाजी पवार यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. येवल्यातून विधानसभेला शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे समजते.
शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर व जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्यासह संभाजी पवार यांनी बुधवारी (दि. ११) मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीत येवल्यातून शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे काय याबाबत चर्चा झाल्याचे समजते. संभाजी पवार यांनी काकांशी (मारोतराव पवार यांच्याशी) व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपल्याला सांगतो, असे सांगितल्याचे कळते. संभाजी पवार यांचा जर शिवसेना प्रवेश निश्चित झाला तर स्वत: उद्धव ठाकरे येवल्यात येऊन त्यांच्या प्रवेशाची जाहीर सभा घेणार असल्याचेही कळते. (प्रतिनिधी)

Web Title: Sambhaji Pawar Matoshri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.