समस्या सोडविण्याची समाजवादी पक्षाची मागणी

By Admin | Updated: September 9, 2016 22:59 IST2016-09-09T22:59:34+5:302016-09-09T22:59:46+5:30

समस्या सोडविण्याची समाजवादी पक्षाची मागणी

Samajwadi Party's demand to solve the problem | समस्या सोडविण्याची समाजवादी पक्षाची मागणी

समस्या सोडविण्याची समाजवादी पक्षाची मागणी

 सिन्नर : शहर व उपनगरातील पाणी समस्या, वीज भारनियमन, पालिका दवाखान्यातील समस्या आदिंसह पालिका हद्दीतील समस्या मार्गी लावून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष रंगा महादू सोनवणे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी उपनगरांमध्ये पाण्याची गंभीर स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी वीज भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होत होती. पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्याने अनेक कामगार व महिलांना कामावर जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी सोडण्याची वेळ निश्चित करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पालिका हद्दीतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गंगावेस भागातील शॉपिंग सेंटर समोरच्या रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डे आहेत. त्यात अनेकदा अपघात होत असतात. सदर खड्डे बुजविण्यात यावे. पंचायत समिती ते म्हसोबा मंदिरापर्यंतचा रस्ता लवकर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं. १ व ३, पालिका कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय आवारात गतिरोधक बसविण्यात यावे. अनेक दिवसांपासून शहरासह परिसरात विविध साथींच्या आजारांनी डोके वर काढले असून प्रत्येक आठवड्याला कीटकनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रंगा सोनवणे यांच्यासह गंगाधर गुंजाळ, ज्ञानेश्वर फडवळ, ज्ञानेश्वर शिरोळे, दीपक जाधव, संजय गायकवाड, बाळू पवार यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Samajwadi Party's demand to solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.