शहीद पोलिसांना मानवंदना
By Admin | Updated: October 21, 2015 23:48 IST2015-10-21T23:47:17+5:302015-10-21T23:48:24+5:30
पोलीस स्मृतिदिन : बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून अभिवादन

शहीद पोलिसांना मानवंदना
नाशिक : देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्र मात मानवंदना देण्यात आली. यावेळी महिला व पुरुष पोलिसांच्या पथकाने हवेत तीन फै री झाडून शहिदांना अभिवादन केले़ पोलीस दलाच्या परंपरेनुसार २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो़
बुधवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना शहीद झालेल्या देशभरातील ४४० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली़ नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जय जीत सिंह, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक निरंजन वायंगणकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पोलीस उपआयुक्त विजय पाटील, एऩ अंबिका यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले़
पोलीस कवायत मैदानावर सकाळी आठ वाजता झालेल्या शोकसंचलनात सशस्त्र पुरु ष पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, पोलीस बॅण्ड पथक यांनी शहिदांना मानवंदना दिली. यावेळी विविध खात्यांतील अधिकाऱ्यांसह, पोलीस अधिकारी व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)