महामानवास अभिवादन...

By Admin | Updated: April 14, 2017 01:04 IST2017-04-14T01:04:36+5:302017-04-14T01:04:52+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजीरोडवरील पुतळ्यास अभिवादन

Salute to the great ... | महामानवास अभिवादन...

महामानवास अभिवादन...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजीरोडवरील पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर सामूहिक बुद्धवंदनेत सहभागी झालेले महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, गजानन शेलार, माजी महापौर शोभा बच्छाव, शाहू खैरे, किशोर घाटे, प्रियंका घाटे, गुलाम शेख, मदन शिंदे, लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, राजू भुजबळ, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, रंजन ठाकरे, संजय खैरनार, संजय साळवे, दिलीप साळवे आदि.नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रात्री १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शुक्रवार, दि. १४ रोजी शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता जुने नाशिक येथील मोठा राजवाडा येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. चौक मंडई, दादासाहेब फाळकेरोड, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली बाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, नेहरू उद्यान, शालिमार, शिवाजी रोडमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत मिरवणूक येणार आहे.

Web Title: Salute to the great ...