भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मानवंदना
By Admin | Updated: July 27, 2016 00:48 IST2016-07-27T00:02:11+5:302016-07-27T00:48:45+5:30
कारगील दिन : विद्यार्थ्यांचे पथसंचलन

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मानवंदना
नाशिक : भारतीय सैन्याने धाडसाने पाकिस्तानी सैन्यांवर १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवला. मे ते जुलै असे तीन महिने हे युद्ध चालले होते. शेवटच्या श्वासापर्यंत जिकरीने लढा देत भारतीय सैन्याने कारगीलचे युद्ध जिंकले. त्यापासून विद्यार्थ्यांसह प्रत्येक भारतीयाने देशभक्तीचा धडा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल व्ही. चित्ते यांनी केले.
प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण करणाऱ्या व देशाला समर्पित होणाऱ्या अमर सैनिकांना सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भोसला मिलिटरी स्कूल येथे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलत होते.