शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सलून चालक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:59 IST

नाशिक : कोरोनामुळे घोषित केलेला लॉकडाऊन आता शिथिल केल्यानंतरही सलून व्यावसायिकांना संसर्गाच्या भीतीमुळे दुकाने उघडण्यास मनाई केली जात आहे. एकीकडे दळणवळणासह अन्य व्यावसायांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली जात असताना सलून व्यवसायावर मात्र निर्बंध आणले जात आहेत.

नाशिक : कोरोनामुळे घोषित केलेला लॉकडाऊन आता शिथिल केल्यानंतरही सलून व्यावसायिकांना संसर्गाच्या भीतीमुळे दुकाने उघडण्यास मनाई केली जात आहे. एकीकडे दळणवळणासह अन्य व्यावसायांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली जात असताना सलून व्यवसायावर मात्र निर्बंध आणले जात आहेत. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असल्याने बुधवारी (दि. १०) नाभिक समाज महामंडळाच्या वतीने जिल्हाभर ठिकठिकाणी सलून चालकांनी आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला. इतरांना परवानगी, मग आम्हाला का नाही, असा सवाल करत सलून चालकांनी आक्रमक होत कुठे काळ्या फिती लावून तर कुठे अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे आपल्याकडे लक्ष वेधले.जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर याठिकाणी सलून चालकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या तसेच दंडाला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.मालेगावी मूक निदर्शनेमालेगाव : शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या मालेगाव नाभिक समाज संघटनेने तोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन केले.मालेगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे व अतुल आहिरे यांचे आदेशानुसार मालेगाव शहर नाभिक संघातर्फे डीके कॉर्नर सोयगाव येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने नाभिक दुकानदार व कारागीर यांना लॉकडाऊनदरम्यान दरमहा १० हजार रुपये मदत द्यावी, या मागण्यांसाठी मूक आंदोलन केले. यावेळी दुकानदार बांधव हातात मागण्यांचे फलक घेऊन सहभागी होते. याप्रसंगी शहर अध्यक्ष दिनेश सोनवणे, अतुल आहिरे, तात्या निकम, बंटी महाले, दिनेश सोनवणे, सागर सैंदाणे, विलास सैंदाणे, योगेश वाघ, किशोर सैंदाणे, रवि आहिरे, विशाल पगारे आदी दुकानदार उपस्थित होते.-------------------------सिन्नर : काळ्या फिती लावत निषेधसिन्नर : अडचणीत सापडलेल्या सलून व्यावसायिकांना दरमहा १० हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने करत काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला. सिन्नर शहरासह वावी, नांदूरशिंगोटे, पांगरी, ठाणगाव, वडांगळी या गावांसह आंदोलन करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे, प्रांत अध्यक्ष दत्तात्रय अनारसे, जिल्हा अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष केशव बिडवे, जिल्हा संघटक रमेश बिडवे, तालुकाध्यक्ष महिंद्र कानडी, नाभिक युवा सेना अध्यक्ष वाल्मीक शिंदे, गोपीनाथ क्षीरसागर, गणेश कदम, वाळीबा जाधव, सुदर्शन कदम, संजय सोनवणे, अशोक सोनवणे, विलास चौधरी, भगवान संत, संदीप व्यवहारे, माधवराव शिंदे आदींसह नाभिक बांधव निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक