विक्रीकर अधिकाऱ्यांचा संप मागे
By Admin | Updated: July 2, 2017 01:10 IST2017-07-02T01:09:38+5:302017-07-02T01:10:04+5:30
सरकारचा प्रतिसाद : मागण्या तत्त्वत: मान्य झाल्याने स्थगिती

विक्रीकर अधिकाऱ्यांचा संप मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ जुलैपासून पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. राज्य सरकार व प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चांतून विक्रीकर अधिकाऱ्यांच्या मागण्या तत्त्वत: मान्य करण्यात आल्याने महाराष्ट्र विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेने जीएसटीच्या स्वागतासाठी सकारात्मक प्रतिसाद देत संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
सरकारसोबत झालेली चर्चा व सरकार मागण्या पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू केलेल्या कार्यवाहीचा विचार करून संघटनेच्या मुंबईतील कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणीने राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून १ जुलैपासून पुकारलेला बेमुदत संप २१ आॅगस्ट २०१७ पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रीकर अधिकाऱ्यांच्या मागण्यावस्तू व सेवाकर कायद्याच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर विभागाची पुनर्रचना त्वरित करणे, ३० जुलैपर्यंत अधिकृत व्यापारी संख्या प्राप्त झाल्यावर त्वरित प्रस्ताव सादर करणे, १२ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार विक्र ीकर उपायुक्त संवर्गातील सर्व ३३ टक्के अधिकाऱ्यांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे आदेश पारित करणे, विक्र ीकर सहआयुक्तांचे ६व्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे २० टक्के पदांकरिता वरिष्ठ वेतनश्रेणीचे आदेश पारित करणे, २८ मार्च २०१५ च्या विभागीय संवर्ग वाटप शासन निर्णयातून विक्र ीकर विभागास कायमस्वरूपी वगळणे, विक्र ीकर विभागातील अधिकारी, कर्मचारी व गट ड कर्मचारी संवर्गाची रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागण्या विक्री कर अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.