भूमाफियांकडून मृत व्यक्तीच्या जमिनीची विक्री

By Admin | Updated: June 23, 2015 00:50 IST2015-06-23T00:49:59+5:302015-06-23T00:50:34+5:30

भूमाफियांकडून मृत व्यक्तीच्या जमिनीची विक्री

Sale of land from landlords by the landlords | भूमाफियांकडून मृत व्यक्तीच्या जमिनीची विक्री

भूमाफियांकडून मृत व्यक्तीच्या जमिनीची विक्री

नाशिक : पंधरा वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे पडून असलेला लाखो रुपये किमतीचा प्लॉट परस्पर विक्री करण्यासाठी बनावट व्यक्ती व बनावट पॅन कार्ड तयार करणाऱ्या भू-माफियांचे कृत्य दिंडोरी प्रांत अधिकाऱ्यांनी उधळून लावले असून, यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ ओझर टाऊनशिप येथे राहणारे दर्शनलाल ओमप्रकाश चोपडा यांचा दिंडोरी तालुक्यातील मौजे जऊळके या ठिकाणी सर्व्हे नंबर १५३/५ मध्ये ४०९ चौरस मीटरचा प्लॉट आहे. चोपडा यांचे सन २००० मध्ये ठाणे येथे निधन झाल्याने सदरचा प्लॉट तसाच पडून होता. दरम्यान, जऊळके शिवारातच नवीन विमानतळ पूर्ण झाल्यामुळे येथील जमिनींचे भाव गगनाला भिडल्याचे पाहून भू-माफियांनी गेल्या अनेक वर्षांपासून पडीत असलेल्या चोपडा यांच्या प्लॉटचा शोध घेऊन त्याची परस्पर विक्री केली. नाशिकरोड येथील नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या संपत हिरामण आवारी याने यात महत्त्वाची भूमिका बजावत चोपडा यांच्या नावे असलेल्या प्लॉट आपल्या नावे करताना दर्शनलाल चोपडा म्हणून बनावट व्यक्ती दुय्यम निबंधकांसमोर उभी केली, त्यासाठी चोपडा यांच्या नावे बनावट पॅन कार्डही तयार करून घेतले. या बेकायदेशीर व्यवहारात ओझर मिग येथे राहणारा राजू नाना सोनवणे व नाशिकरोड चेहडीपंपिंग परिसरात राहणारा दीपक हरबनसिंग ठाकूर या दोघांनी मदत केली. दुय्यम निबंधकांसमोर नोंदविण्यात आलेल्या या व्यवहाराची तलाठी दप्तरात फेरफार नोंदही घेण्यात आल्याने हा व्यवहार कायदेशीर झाल्याचे समजून संपत आवारी याने सदरचा प्लॉट कोणा शहा नामक व्यक्तीला ४० लाख रुपयांना विकूनही टाकला.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मयत दर्शनलाल चोपडा यांच्या मुलाने तलाठी कार्यालयात अर्ज करून वडिलांच्या प्लॉटवर आपले नाव लावण्याची विनंती केली, त्यासाठी त्याने दर्शनलाल यांचा मृत्यूचा दाखलाही सादर केला. चोपडा यांच्या मुलाचा अर्ज आल्यानंतर तलाठ्यांनी चौकशी सुरू केली असता उपरोक्त प्रकार उघडकीस येऊन त्यांनी प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांच्या कानी घातला. त्यावर भोगे यांनी स्वत:हून प्रकरण दाखल करून घेत, जागा मालक शहा तसेच त्यांना प्लॉट विक्री करणारे व मदत करणारे अशा चौघांना नोटीस बजावली; परंतु शहा वगळता कोणीच चौकशीसाठी उपस्थित झाले नाही. या प्रकरणाच्या खोलवर जाण्यासाठी चोपडा यांच्या नावे सादर करण्यात आलेल्या पॅन कार्डची वैधता तपासली असता तेदेखील बनावट असल्याचे उघडकीस आले.

Web Title: Sale of land from landlords by the landlords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.