शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मुंबईकरांना १५० टन भाजीपाला, फळांची विक्र ी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:42 IST

कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमारे १५० टन ताजा भाजीपाला आणि फळे पाठविण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : आत्मा अंतर्गत स्थापन शेतकरी गटांचा उपक्र म

सिन्नर : कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमारे १५० टन ताजा भाजीपाला आणि फळे पाठविण्यात आली आहेत. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून या उत्पादनांची रास्त दरात विक्र ी करण्यात येत आहे.कोरोनामुळे देशात आपत्ती जाहीर करण्यात आली असून, लॉकडाउनमुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले आहे. सर्वच ठिकाणी त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडा जाणवत असून अनेकांनी या संधीचा फायदा घेत उखळ पांढरे करायला सुरुवात केली आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला, दूध वाहतूक आणि विक्री करायला परवानगी दिली असली तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत देशाची आर्थिक राजधानी असणाºया मुंबापुरीत सर्वसामान्यांची अडवणूक होऊ नये यासाठी तालुक्यातील वडगाव, सिन्नर, जोगलटेंभी व दोडी येथील शेतकरी बचतगटांनी पुढाकार घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत हे शेतकरी गट स्थापन करण्यात आले असून, उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मुंबईसाठी १५० टन भाजीपाला पुरविण्यात आला आहे.वडगाव सिन्नरच्या वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गटामार्फत आठवड्यातून तीन वेळा लक्ष्मीनगर (गोरेगाव), नर्सीपार्क(जुहू), शारण ग्रुप (वर्सोवा) येथे उमेशा ठक्कर यांच्या मदतीने भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर जोगलटेंभी येथील बळीराजा शेतकरी बचतगटाने नंदिनी छाब्रिया व मुकुंद मेहरा यांच्या साहाय्याने ब्रीचकॅण्डी परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात व दोडी येथील शेतमाल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने विविध सोसायट्यांमध्ये भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे.आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गटांना मुंबईत भाजीपाला विक्र ीला पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी पुढाकार घेतला. नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक संजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाट, हेमंत काळे यांनी वाहतूक परवान्यासह भाजीपाला विक्र ीसाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न