भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी पगार
By Admin | Updated: January 11, 2016 22:56 IST2016-01-11T22:54:21+5:302016-01-11T22:56:35+5:30
भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी पगार

भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी पगार
कळवण : भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांची पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षनिरीक्षक रामजी गवळी व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. पगार समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून निवडीचे स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष निवडीसाठी भाजपा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुकाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, राष्ट्रीय कार्यकारिणीचे माजी सदस्य रमेश रावले, नेते अशोक जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष गोविंद कोठावदे, महिला आघाडीच्या अध्यक्ष संगीता अहेर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुक्यात संघटनात्मक पक्षबांधणी भक्कम करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. तालुक्यात क्रि याशील १०० सदस्य व सहा हजार २८ प्राथमिक सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरच तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशी माहिती यावेळी तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांनी दिली.
यावेळी शहराध्यक्ष निंबा पगार, माणिक देवरे, राजेंद्र पगार, नगरसेवक दिलीप मोरे, राजेंद्र
पाटील, हरिश्चंद्र पगार, सुरेश
निकम, संदीप अमृतकार, नीलेश कायस्थ, हेमंत रावले, प्रभाकर
निकम, दीपक खैरनार, राजेंद्र
मालपुरे, सचिन सोनवणे, नितीन
भामरे, सतीश देशमुख, विजय
पगार, विनोद मालपुरे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)