गॅब्रियलमध्ये पगारवाढीचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST2021-01-10T04:12:04+5:302021-01-10T04:12:04+5:30

या करारामध्ये दर महिन्याला १०,१०० रुपये व इतर भत्त्यांमध्ये अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे. मेमध्ये वन टाइम इन्क्रिमेंट, ...

Salary increase agreement in Gabriel | गॅब्रियलमध्ये पगारवाढीचा करार

गॅब्रियलमध्ये पगारवाढीचा करार

या करारामध्ये दर महिन्याला १०,१०० रुपये व इतर भत्त्यांमध्ये अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे. मेमध्ये वन टाइम इन्क्रिमेंट, दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान, बेसिक, मेन्टेनन्स अलाउन्स, ओव्हर टाइम मेडिक्लेम अलाउन्स, अटेंडन्स बोनस, २२ वर्षांसाठी लाँग सर्व्हिस इन्क्रिमेंट, रिटायरमेंट गिफ्ट, तसेच सर्व कामगारांना वैयक्तिक बिनव्याजी कर्ज, तसेच शैक्षणिक कर्जही देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. या करारादरम्यान व्यवस्थापनाच्या वतीने राजेंद्र अभंगे, निखिल पटणी, मनोज शर्मा, प्रशांत देशपांडे, विजय देवरे, परिक्षित जोशी, मनोज शेलार तर गॅब्रियल एम्प्लाॅइज युनियनच्या वतीने अध्यक्ष लालचंद साळुंके, जनरल सेक्रेटरी आबा हिरे, उपाध्यक्ष यशवंत पवार, नरेश कुलकर्णी, खजिनदार प्रफुल्ल काकुळते, काशिनाथ गवळी, रिजवाना लाल सैय्यद यांनी कामगारांच्या वतीने करारावर सह्या केल्या. (फोटो ०९ गॅब्रीयल)

Web Title: Salary increase agreement in Gabriel