कळवण बाजार समितीच्या उपसभापतिपदी पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:14 IST2017-08-18T23:40:49+5:302017-08-19T00:14:34+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळवणचे माजी सरपंच हरिश्चंद्र वसंतराव पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कळवण बाजार समितीच्या उपसभापतिपदी पगार
कळवण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळवणचे माजी सरपंच हरिश्चंद्र वसंतराव पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विद्यमान उपसभापती डी. एम. गायकवाड यांनी आवर्तनपद्धतीने राजीनामा दिल्याने सभापती धनंजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. यात पगार यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे , कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार यांनी नवनिर्वाचित उपसभापती पगार यांचा सत्कार केला.
विशेष सभेस संचालक रामचंद्र गायकवाड, साहेबराव पाटील, रमेश पवार, जितेंद्र पगार, शीतलकुमार अहिरे, मनोज शिंदे, विष्णू बोरसे, योगेश पगार, कृष्णा पगार, नामदेव पगार, योगेश मालपुरे, शंकरराव निकम, गजेंद्र पवार, पांडुरंग पगार, संदीप पगार, मनोज पाटील, लखन पगार, रामस्वामी पाटील, मनीष पगार आदी उपस्थित होते.