शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वेतन करारही अडकला आर्थिक दृष्टचक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 1:10 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीमुळे रखडलेला कामगार करार यंदाही होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावे की कराराच्या तरतुदी अंमलात आणाव्यात हा मुद्दा ज्वलंत असल्याने आगामी काळात एस. टी. कामगारांना पुन्हा एकदा या मुद्द्याला सामोरे जावे लागणार आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीमुळे रखडलेला कामगार करार यंदाही होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावे की कराराच्या तरतुदी अंमलात आणाव्यात हा मुद्दा ज्वलंत असल्याने आगामी काळात एस. टी. कामगारांना पुन्हा एकदा या मुद्द्याला सामोरे जावे लागणार आहे. येत्या मार्चमध्ये वेतन करार संपुष्टात येणार असल्याने तत्पूर्वी नव्या वेतन कराराचा मसुदा तयार करणे अपेक्षित आहे. मात्र यंदा अजूनही कराराची चर्चा झालेली नसल्याने यामागे एसटीपुढील आर्थिक संकट असल्याचे बोलले जात आहे.राज्य परिवहन महामंडळ सध्या आर्थिक संकटातून जात असल्यामुळेच महामंडळाकडून काटकसरीचे धोरण अवलंबिले जात आहे. याच भूमिकेतून एसटीतील कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन अदा न करता टप्प्याटप्यापे वेतन दिले जात आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती असल्याने कर्मचाऱ्यांपुढे भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१७ पासून राज्यातील १३ कामगार प्रमुख कामगार संघटनांनी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन करार करण्यात यावे, अशी मागणी लावून धरलेली आहे. मात्र त्यावर मंत्री महोदयांनी काढलेल्या तोडग्याबाबत अजूनही कर्मचाºयांचे समाधान झालेले नाही.महामंडळ आर्थिक संकटातून जात असताना पुन्हा नव्याने कामगारांचा वेतन करार करण्याची वेळ आलेली असल्याने करार संपुष्टात येण्याच्या तीन महिने अगोदरच महामंडळाला वेतन कराराचा मुसदा सादर करणे अपेक्षित आहे. परंतु आकडेवारीच्या गोंधळात कर्मचारी आणि संघटनादेखील गुरफटल्या गेल्यामुळे कामगारांपुढील वेतनाचा प्रश्न आजही कायम आहे. महामंडळाने सुचविलेली वाढ मान्य नसेल तर कर्मचाºयांना कंत्राटीचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे यंदा महामंडळ वेतन कराराच्या मुद्द्यावर कोणता पर्याय आणणार याविषयीची भीती कर्मचाºयांमध्ये आताच दिसू लागली आहे. (क्रमश:)मंत्रिमंडळाची प्रतीक्षाराज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळाचे खाते कुणाकडे जाते आणि कोण मंत्री असणार याकडे आता कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे. सातत्याने दाखविण्यात येणारा संचित तोटा, दुसरीकडे महामंडळाच्या विविध विभागांचे करण्यात आलेले खासगीकरण आणि त्यावरील खर्च, गाड्यांच्या खरेदी, अन्य घटकांना देण्यात आलेली कोट्यवधींची मदत आणि कुणाही मागणी नसताना महामंडळात अनावश्यक करण्यात आलेल्या खर्चामुळे तोट्यात भर पडल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये आहे. त्यामुळे नव्या राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे खाते कुणाकडे जाते हादेखील महत्त्वाचा विषय आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक