पांगरी संस्थेच्या अध्यक्षपदी पगार

By Admin | Updated: April 15, 2016 00:05 IST2016-04-15T00:02:57+5:302016-04-15T00:05:17+5:30

निवडणूक : उपाध्यक्षपदी संजय वारुळे बिनविरोध

Salary of the Chairman of Pangari Institute | पांगरी संस्थेच्या अध्यक्षपदी पगार

पांगरी संस्थेच्या अध्यक्षपदी पगार

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रूक विकास संस्थेच्या अध्यक्षपदी शांताराम श्रीपत पगार यांची, तर उपाध्यक्षपदी संजय सदाशिव वारुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या महिन्यात झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलने बाजी मारली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी नवनिर्वाचित संचालकांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती.
अध्यक्षपदासाठी शांताराम पगार यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून आत्माराम पगार व अनुमोदक म्हणून भोरू निकम यांची स्वाक्षरी होती, तर उपाध्यक्षपदासाठी संजय वारूळे यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून विश्वनाथ पगार व अनुमोदक म्हणून बाजीराव कांडेकर यांची स्वाक्षरी होती.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक
रवि पगार, बाबासाहेब पगार, जगन पगार, विठ्ठल पगार, संपत
पगार, ज्ञानदेव पगार, विलास कलकत्ते, डॉ. भीमाशंकर पगार,
शंकर पगार, सुदाम पगार,
कारभारी पगार, संदीप पगार, विलास निरगुडे, संदीप वारूळे, नाना पांगारकर, बारकू पगार, सुनंदा
पगार, चंद्रकला पगार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Salary of the Chairman of Pangari Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.