Sakora road maintenance | साकोरा रस्त्याची दुरवस्था
साकोरा रस्त्याची दुरवस्था

ठळक मुद्देवाहनधारकांमध्ये संताप : शासकीय खात्यांची टोलवाटोलवी

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत धुळीचे साम्राज्य तर पुढे रस्ताच जलमय झाला असल्याने मोठमोठ्या खड्यांमधून वाहनचालकांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून चांगलीच कसरत करावी लागत आहे.
नांदगाव ते साकोरा या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर उड्डाणपुलापर्यंत नवीन रस्त्याचे काम चालू असल्याने संबंधीत ठेकेदाराने पर्यायी कुठलाही नवीन रस्ता उपलब्ध करून न दिल्याने परिसरातील तब्बल वीस ते बावीस गावांतील वाहनचालकांना खड्डेमय अण िप्रचंड धुळीतून प्रवास करावा लागत आहे.तसेच पुढे याच रस्त्यावर शिवमळा ते साकोरा रस्त्यांवरील मोरखडी मातीनाला बंधारा यावर्षी शंभर टक्के पाण्याने भरल्याने त्याचे पाणी गेल्या चार मिहन्यांपासून या रस्त्यावर वाहत असल्यामुळे मोठ-मोठे खड्डे पडले असून रस्त्यावर पाणी साचल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहत असल्याने रस्त्यावर पाणी की, पाण्यात रस्ता हेच लक्षात येत नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नांदगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने साकोरा रस्त्यावरून कळमदरी, मंगळणे, काकळणे, वेहळगांव, सावरगाव, पळाशी, पांझण, जामदरी, तळवाडे, सायगांव, पिलखोड, गिरणाडॅम, आमोदे, बोराळे अशा तब्बल वीस ते बावीस गावांतील वाहनचालकांना याच रस्त्यावरून मोठी कसरत करून नांदगाव येथे यावे लागते.
संबंधित रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून, यासंदर्भात विचारणा केली असता,त्यांनी सरळ आपलेवरचे घोंगडे झटकवून लघुपाटबंधारे विभागांवर झटकवून मोकळे झाले आहे. त्यामुळे सा. बा. विभाग अण िल. पा. विभाग यांच्या हद्दीच्या वादामुळे रस्त्याची दुरु स्ती रखडली आहे. विशेष म्हणजे संबंधित रस्ता आता एका ठेकेदाराकडे रु ंदीकरणासाठी वर्ग करण्यात आला असल्याने गेल्या चार मिहन्यांपासून रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या रस्त्यावर एकही कर्मचारी फीरकतांना दिसत नाही. तसेच दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर असेच पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत होती. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने या ठिकाणी दोन जागेवर मोरी टाकून तसेच सुरूंग लावून पाणी मोकळे वाहून रस्त्यावर भर टाकून रस्ता उंच करणेकामी लाखो रूपये कागदोपत्री खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे.
सुरूवातीला रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूने मोठी चारी करून पाण्याला मोकळी वाट करून दिली असती तर आज अशी दुरवस्था झाली नसती असे अनेक नागरिक बोलून दाखवत आहे. संबधीत दोन्ही विभागाच्याअधिकार्यांनी येवून पाहणी करून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

साकोरा ते नांदगाव या तीन कि.मी.च्या अंतरात मोठं मोठे खड्डे पडले असून, पाण्याच्या खड्ड्यातून अण िधुळीत प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे अनेकांना डोळ्यांचे तसेच मनक्याचे आजार जडले आहेत.
संबंधित विभागाने त्वरीत या रस्त्याची दुरु स्ती करावी.
योगेश पाटील (मुख्याध्यापक).

या रस्त्यावर आमचे रोजचेच जाणे-येणे चालू असल्याने मोठमोठ्या वाहनांचाआण िवाहनचालकांच्या हाडांचा फार खिळखिळा झाला आहे.त्यामुळे बाहेरगावी दुधाच्या कॅना घेऊन जाणे म्हणजे नुकसान करवून घेणे झाले आहे.
दत्तू शेवाळे , रिहवासी.

(फोटो ०५ साकेरा, ०५ साकोरा १)
 

Web Title: Sakora road maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.