त्र्यंबकनजिक साकारतेय सांडपाणी प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 00:20 IST2022-02-18T00:20:09+5:302022-02-18T00:20:38+5:30

त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांची मंजुरी दिली असून त्यापोटी पहिला हप्ता म्हणून ३४ कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी नमूद केले.

Sakarateya Sewage Treatment Plant near Trimbak | त्र्यंबकनजिक साकारतेय सांडपाणी प्रक्रिया केंद्र

त्र्यंबकनजिक साकारतेय सांडपाणी प्रक्रिया केंद्र

ठळक मुद्देमुख्याधिकारी : ४० कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर

त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांची मंजुरी दिली असून त्यापोटी पहिला हप्ता म्हणून ३४ कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी नमूद केले.
दोन दिवसांपासून गोदावरी जलप्रदूषण संबंधित महाराष्ट्र शासन, नाशिक मनपा व त्र्यंबक नगरपरिषद यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यासंदर्भात जाधव म्हणाले, की गोदावरी नदीपात्रात नगरपरिषदेच्या पहिल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून मल:निस्सारण होण्याचा प्रकार घडला असल्याचे याचिकाकर्त्यांचे मत होते व त्यांनी ते हरित लवादाला पटवून दिले. त्यानुसार हरित लवादाने महाराष्ट्र शासन, नाशिक मनपा व त्र्यंबक नगरपरिषद यांच्यावर ठपका ठेवला होता. परंतु याबाबत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गंभीर दखल घेऊन सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. नगर अभियंता यांच्याकडून प्रकल्पाचा ४० कोटींचा आराखडा तयार करून नकाशासह राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.

सांडपाणी मैल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा सेंद्रिय खत म्हणून शेतकरी वापर करू शकतात, तर घनकचऱ्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणारे खत शेतात टाकून शेतकरी सेंद्रिय शेती करू शकतात, असा हा प्रकल्प आहे. सदर पाइपलाइन नदीपात्रात नव्हे; तर रस्त्यापासून दूर आहे. अहिल्या गोदावरीचे पात्र स्वच्छ केले जाईल, यासाठी जलतज्ज्ञांचे मतदेखील विचारात घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Sakarateya Sewage Treatment Plant near Trimbak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.