रस्ता रुंदीकरणासाठी स्थायी समिती सभापतीना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:26 IST2020-10-28T17:26:16+5:302020-10-28T17:26:45+5:30
जानोरी : महानगर पालिका हद्दीतील म्हसरूळ गाव ते वरवंडी हा रस्ता महानगरपालिकेने अतिशय अरुंद केलेला असल्याने शेतकरी वर्गाला व वाहनधारकांना या रस्त्यावर खूप मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत असल्याने भाजपा दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके यांनी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्याकडे विनंती अर्ज करून साकडे घातले आहे. याच वेळी सभापती गीते यांनी दिवाळीनंतर या रस्त्याचे रुंदीकरण करून दोन्ही बाजूच्या दुतर्फा मोठ्या केल्या जातील असे आश्वासन दिले आहे.

महानगर पालिका हद्दीतील म्हसरूळ गाव ते वरवंडी हा रस्ता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वाहतुकीसाठी वापरतात. नाशिक येथील मुख्य भाजीपाला मार्केट येथे मोहाडी, शिवनई, आंबेदिंडोरी, कुर्णली, जानोरी, खडक सुकेणे, या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या रस्त्याने ये-जा करतात. परंतु दिंडोरी तालुका हद्दीपर्यंत हा राजमार्ग रुंद व मोठा आहे.
परंतु महानगरपालिका हद्दीपासून हा रस्ता अतिशय अरुंद असून रस्त्याच्या दुतर्फा झाडांनी वेढल्या गेल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्याने ये-जा करण्यासाठी खूप कसरत करावे लागते. कधी कधी छोटष-मोठे अपघात होतात, त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करून झाडांचे अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.