घरकुल योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:12+5:302021-07-19T04:11:12+5:30
आमदार आहेर यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या आदेशानुसार घरकुल यादीत चांदवड तालुक्यातील १५ हजार ६०६ व ...

घरकुल योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी साकडे
आमदार आहेर यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या आदेशानुसार घरकुल यादीत चांदवड तालुक्यातील १५ हजार ६०६ व देवळा तालुक्यातील ९०४६ लाभार्थींची नोंद केली असून, पुढील वर्षीदेखील चांदवड व देवळा तालुक्यास उद्दिष्ट प्राप्त झाले तर घरकुले पूर्ण करण्यासाठी १० ते १२ वर्षे लागू शकतात. तसेच सन २०१७-१८ मध्ये प्रपत्र ‘ड’ ऑनलाइन करताना काही ग्रामपंचायतींतर्गत लाभार्थी नोंदी बाकी राहिली असल्याने प्रपत्र ‘ड’मध्ये शिल्लक घरकुल लाभार्थींची नोंद होण्यासाठी ॲप काही दिवसांसाठी पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे, तसेच नाशिक जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत व त्याबाबतची बैठक आयोजित करण्याची मागणीदेखील करण्यात आली. दरम्यान, आहेर यांनी आयुष्यमान भारत योजना प्रभावीपणे चालण्यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ. नितीन गांगुर्डे, चांदवड भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, विजय धाकराव, सुभाष पूरकर, गणेश महाले, योगेश ढोमसे, ॲड. शांताराम भवर, पुंडलिक गुंजाळ, देवीदास आहेर, काका काळे आदी उपस्थित होते.
फोटो- १८ भारती पवार
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या भेटीप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आमदार डॉ.राहुल आहेर, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सौरभ पाटील आदी.
180721\18nsk_35_18072021_13.jpg
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या भेटीप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आमदार डॉ.राहुल आहेर, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सौरभ पाटील आदि.