शहरं
Join us  
Trending Stories
1
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
3
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
4
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
5
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
6
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
7
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
8
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
9
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
10
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
11
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
12
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
13
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
14
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
15
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
16
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
17
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
19
T20 WC 2024 : न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून टीम इंडियाचे स्वागत; पाहा PHOTOS
20
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया

येमको बँकेच्या ठेवी परत मिळण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 11:01 PM

येवला : येवला मर्चंट्स बँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत असणाऱ्या २१ कोटींच्या ठेवी तत्काळ मिळाव्यात यासाठी बँकेचे उपाध्यक्ष सूरज पटणी व अधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी भुजबळ यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य प्रशासकांना ठेवी लवकरात लवकर परत करण्याची सूचना केली.

ठळक मुद्देभुजबळांना निवेदन : जिल्हा बँकेला केली सूचना

येवला : येवला मर्चंट्स बँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत असणाऱ्या २१ कोटींच्या ठेवी तत्काळ मिळाव्यात यासाठी बँकेचे उपाध्यक्ष सूरज पटणी व अधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी भुजबळ यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य प्रशासकांना ठेवी लवकरात लवकर परत करण्याची सूचना केली.जिल्ह्यातील पहिली सहकारी व्यापारी बँक असलेल्या येमको बँकेने शहराच्या व्यापार व अर्थकारणाला मोठा आधार दिला आहे. नोटाबंदीपासून बँकेचे २१ कोटी रुपये जिल्हा बँकेच्या येवला शाखेत अडकून पडले आहेत. बँकेने वारंवार, तसेच वेळोवेळी संबधितांच्या भेटी घेऊन, मुख्य कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून ठेवी परत करण्याची मागणी केली. आतापर्यंत बँकेला ३ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम मिळाली. मात्र, उर्वरित पैसे मिळत नसल्याने संचालकांनी येथील जिल्हा बँक शाखेत धरणेदेखील धरले होते.येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांच्याकडे बँकेचे उपाध्यक्ष सूरज पटणी यांनी बँकेचा अडकलेला निधी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यावेळी भुजबळ यांनी पटनी यांना नाशिक येथे बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार उपाध्यक्ष पटणी, मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर गौरकर, व्यवस्थापक अरविंद जोशी यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य प्रशासक पिंगळे यांना भुजबळ फार्म येथे बोलावून घेत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी अडकलेल्या ठेवी तत्काळ बँकेला उपलब्ध करून द्या, अशी सक्त सूचना त्यांनी केली. 

टॅग्स :bankबँकChagan Bhujbalछगन भुजबळ