कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सेवाभावी संस्थांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST2021-08-14T04:17:43+5:302021-08-14T04:17:43+5:30

महापालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी (दि. १२) या संस्थांची बैठक पार पडली. गेल्या वर्षी राज्य शासनाने कोरोना नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर ...

Sakade to charitable organizations for the third wave of Corona | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सेवाभावी संस्थांना साकडे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सेवाभावी संस्थांना साकडे

महापालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी (दि. १२) या संस्थांची बैठक पार पडली. गेल्या वर्षी राज्य शासनाने कोरोना नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविली होती. त्यात अनेक संस्थांनी महानगरपालिकेस सहकार्य केले होते, तर अनेक सामाजिक संस्थांनी स्वतःच्या खर्चातून नागरिकांना मास्कचे वाटप, अन्नाचे पाकीट, पाणीवाटप, गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये असेच सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षण अधिकारी डॉ. सुनीता धनगर, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे या वेळी उपस्थित होते.

छायाचित्र आर फोटोवर १२ एनएमसी

Web Title: Sakade to charitable organizations for the third wave of Corona