शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साजू सॅम्युअलच्या शौर्याला नाशिक पोलिसांचा ‘सॅल्यूट’

By अझहर शेख | Updated: June 25, 2019 18:55 IST

सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला मिळालेली प्रत्येकी ७० हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे सहायक आयुक्त रमेश पाटील यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देदोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्यूअल कुटुंबाला मदत सॅम्युअलला सात महिन्यांची चिमुकली

नाशिक : जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या मुथूट फायनान्सचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलने (२९, रा. मूळ केरळ) शौर्यपूर्ण कामगिरी बजावली. त्याचा आक्रमक प्रतिकार थोपविण्यासाठी दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यामुळे सॅम्युअलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला मिळालेली प्रत्येकी ७० हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे सहायक आयुक्त रमेश पाटील यांनी जाहीर केले.सहा फूट उंचीच्या धाडसी सॅम्युअलने दरोडेखोरांचा हल्ला रोखण्यासाठी थेट आपत्कालीन अलार्म वाजविला. यामुळे सर्वांना धोक्याची जाणीव झाली आणि दरोडेखोर बिथरले. दरोडेखोरांना त्यांचा कट उद््ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली. झटापट करणा-या सॅम्यूअलवर चिडलेल्या परमेंदरने पिस्तूलने तीन गोळ्या त्याच्या शरीरावर झाडल्या. काही सेकंदात सॅम्यूअल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर परमेंदरचा साथीदार संशयित हल्लेखोर आकाशसिंग याने त्याच्याजवळी पिस्तूलने दोन गोळ्या झाडून पळ काढला.जिवावर उदार होऊन सॅम्यूअलने कुठल्याही बाबीचा विचार न करता कार्यालय व त्यामधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करत दरोडेखोरांसोबत झुंज दिली. त्यामुळे ग्राहकांचे कोट्यवधींचे सोने सुरक्षित राहिले. सॅम्युअलच्या या धाडसाने पोलिसांचीही मने जिंकली. या हल्ल्यात निष्पाप सॅम्यूअलचा मृत्यू झाल्याने शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह गुन्हे शाखांचे तपासी पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्याचा चंग बांधला. आठवडाभरात पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. गुन्ह्याचा सूत्रधार जितेंद्रसिंग व शूटर परमेंद्र सिंगला बेड्या ठोकल्या. या कामगिरीबद्दल नांगरे-पाटील यांनी तीनही तपासी पथकांना प्रत्येकी ७० हजारांचे बक्षीस जाहीर केले. सामाजिक संवेदना जागृत ठेवत बक्षिसाची मिळालेली २ लाख १० हजारांची रक्कम सॅम्युअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचा निणर्य पथकातील पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी घेत अनोखा ‘सॅल्यूट’ केला.सॅम्युअलला सात महिन्यांची चिमुकलीसॅम्युअल हा अभियंता होता. मुंबईच्या विभागीय कार्यालयातून नाशिकच्या मुथूट कार्यालयातील यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी सॅम्युअल आला होता. सॅम्युअल विवाहित असून, त्याच्या पश्चात पत्नी व सात महिन्यांचे बाळ आहे. सॅम्युअला कुटुंबाचा मोठा आधार होता. याची जाणीव ठेवत पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलRobberyदरोडाFiringगोळीबार