येवल्यात शनिवारी संत संमेलन
By Admin | Updated: May 20, 2014 23:51 IST2014-05-20T23:51:55+5:302014-05-20T23:51:55+5:30
संत संमेलन व त्रिदिनात्मक दत्तयागाचे आयोजन येत्या शनिवारी जनार्दनस्वामी आश्रम येथे करण्यात आल्याची माहिती महंत संजयदास कुलकर्णी यांनी दिली.

येवल्यात शनिवारी संत संमेलन
येवला : सावरगाव येथे अखिल भारतीय वारकरी संप्रदाय कुंभमेळा परिषद व सावरगाव येथील श्री गुरुदेव दत्त विश्वस्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संत संमेलन व त्रिदिनात्मक दत्तयागाचे आयोजन येत्या शनिवारी (दि. २४) सकाळी ९ ते ११ या दरम्यान जनार्दनस्वामी आश्रम येथे करण्यात आल्याची माहिती महंत संजयदास कुलकर्णी यांनी दिली. भारतीय वैदिक संस्कृतीत कुंभमेळा पर्वात सर्व आखाडे व खालसे सहभागी होतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत-महंत गेल्या अनेक वर्षांपासून सहभागी होतात. सन २०१५ मध्ये नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या संत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत मेळाव्यात श्रीश्री १००८ आचार्य महामंडलेश्वर रामलखनदास महाराज, श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अखिल भारतीय वारकरी संप्रदाय अध्यक्ष डॉ. रामकृष्णदास महाराज, कार्याध्यक्ष अॅड. काशीनाथदास महाराज यांच्यासह अखिल भारतातील ६० संत-महंत या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या संत मेळाव्यास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महंत बापू गुरू कुलकर्णी यांनी केले आहे.