शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

संतांनी जाती-जमातीच्या भिंती सैल केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:15 IST

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात. कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरोबरीने महिला संतांनीदेखील जाती-जमातीच्या भिंती सैल करण्याचे अद्भुत कार्य केल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी केले.

ठळक मुद्देतारा भवाळकर : दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे गुंफले पुष्प

नाशिक : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात.कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरोबरीने महिला संतांनीदेखील जाती-जमातीच्या भिंती सैल करण्याचे अद्भुत कार्य केल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी केले.नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे साठावे पुष्प परशुराम सायखेडकर सभागृहात गुरुवारी (दि.२०) भवाळकर यांनी ‘महिला संतांचे क्रांतिकारक कार्य’ या विषयावर गुंफले. यावेळी त्यांनी १२व्या शतकापासून भारतात झालेला संत संप्रदायाचा उगम, पुरुष संतांसोबत महिला संतांचे सामाजिक योगदान, लोकसंस्कृती, संत साहित्य, भाषा संस्कृती, महिला संतांची कामगिरी, असा चौफेर आढावा आपल्या व्याख्यानातून घेतला.भवाळकर म्हणाल्या, या महाराष्टÑात संत परंपरा मोठी असली तरी या परंपरेत होऊन गेलेली संत स्त्रियांची मालिकाही तितकीच मोठी आहे. महाराष्ट्रातील लोकांना संत माहीत आहेत; मात्र महिला संतांविषयी फारशी माहिती नाही. महिला संत मालिकेतदेखील सर्व जाती-जमाती व पंथांच्या स्त्रियांचा समावेश आढळून येतो. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, विठाबाई, विठाई, निर्मलाबाई, बहिणाबाई अशी कितीतरी नावे संत स्त्रियांची घेता येतील.संत परंपरेत होऊ न गेलेल्या महिलांचे कार्यदेखील तितकेच क्रांतिकारक असल्याचे त्या म्हणाल्या. इतिहासाकडे सांस्कृतिक अंगाने बघितल्यास महिला संतांचे कार्य व त्यामधील सत्यतेचा प्रत्यय नक्कीच येतो. महाराष्टÑात उत्तर व दक्षिण भारतामधील संस्कृतीचा संगम झाल्याचे पहावयास मिळते.सगळे संत पंढरीचा राजा विठ्ठलाचे उपासक होते, असेही भवाळकर यांनी यावेळी सांगितले. संतांनी निर्माण केलेल्या पार्श्वभूमीमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना सत्ता स्थापन करणे अधिक सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले.‘मराठी पाट्या’ आंदोलन गमतीदारमहाराष्ट्रात भाषाभाषांमध्ये भेदाभेद केला जातो, ही खंत व्यक्त करताना भवाळकर यांनी ‘मराठी पाट्या’ लावण्याचा हट्ट धरणाऱ्यांना चपराक लावली. मराठी पाट्यांसाठी झालेले आंदोलन गमतीदार असेच होते. एखाद्या दुकानावर इंग्रजीत झळकणारे नाव मराठी अर्थात देवनागरी लिपित झळकले म्हणजे मराठीत झळकले, असा गोड गैरसमज करून घेत राजकीय पुढाºयांनी आंदोलन केले ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. लिपी बदलली म्हणजे भाषा बदलते असे अजिबात नाही, असे भवाळकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक