संत सावता, नामदेव महाराज स्मृतिसोहळा
By Admin | Updated: July 28, 2014 00:56 IST2014-07-27T22:09:06+5:302014-07-28T00:56:54+5:30
सिन्नर : शहर व परिसरात संतश्रेष्ठ सातवा महाराज व संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा स्मृतिसोहळा उत्साहात

संत सावता, नामदेव महाराज स्मृतिसोहळा
सिन्नर : शहर व परिसरात संतश्रेष्ठ सातवा महाराज व संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा स्मृतिसोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील महामित्र परिवाराच्या वतीने शिवाजी चौकात स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संतश्रेष्ठ सावता महाराज यांनी आपल्या अभंगातून कर्म सिद्धांत मांडला आहे. ‘कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी, मिरची लसून कोथिंबीर अवघा जाहला हरी’ दैववादात गुंतून पडण्यापेक्षा कर्मवाद श्रेष्ठ असल्याचे त्यांनी यातून सांगितले आहे. शेताता कर्म करतानाच देवाचे नामस्मरण करा, मात्र काम सोडून रिकाम वेळ खर्च करु नका, अशी त्यांची शिकवण होती. सावता महाराज यांचे जन्मगाव आरण पंढरपूरपासून अवघ्या २० किलोमीटर ँंअंतरावर असतानाही ते कधीही पंढरीच्या वारीला गेले नाही. राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या त्यांच्या मळ्यात विसवण्याची परंपरा आजही टिकून आहे, अशी माहिती दत्ता वायचेळे यांनी यावेळी दिली.
सावता महाराजांच्या प्रतिमेस बाजीराव माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत गोरोबा काका भजनी मंडळाने सादर केलेल्या विविध भजनांची सर्वांचे लेक्ष वेधून घेतले. ह. भ. प. विश्वनाथ महाराज क्षीरसागर, रवींद्र महाराज यांनी विविध अभंग सादर केले. किशोर जाधव यांनी प्रास्ताविक केले. मनोज माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर अनंत खांबेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी महामित्र परिवाराने तयार केलेल्या सावता महाराज चित्रदर्शिकेचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मनमोहन गुजराथी, अशोक भागवत, राजेंद्र देशमुख, तुकामरा गिते, अनिल वाघ, ज्ञानेश्वर भालेराव, रवींद्र भास्कर, सोमनाथ लोहारकर, जगन जाधव, नामदेव कुटे, गोपीनाथ वाजे, नितीन हांडोरे, विनायक मिठे, अशोक कांडेकर, मधुकर वाजे, बहिरू शिंदे, राजेंद्र जाधव आदिंसह नागरिक उपस्थित होते.
येथील विजयनगर भागातील संत सावता महाराज मंदिरात पुण्यतिथीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ ला अभिषेक, आठ वाजता सत्यनाराणय पूजन व दहा वाजता भजनी मंडळाच्या भजन गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारी एकपासून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सेवाभावी संस्थांचे सदस्य, महिला मंडळ सहभागी झाले होते. (वार्ताहर)