संत गोरोबा काका पालखीची मिरवणूक

By Admin | Updated: May 1, 2017 01:30 IST2017-05-01T01:29:53+5:302017-05-01T01:30:02+5:30

सातपूर : संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांच्या सप्तशताब्दी पुण्यतिथीनिमित्ताने शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

Saint Goroba Kaka Palakhi procession | संत गोरोबा काका पालखीची मिरवणूक

संत गोरोबा काका पालखीची मिरवणूक

 सातपूर : संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांच्या सप्तशताब्दी पुण्यतिथीनिमित्ताने जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.
बी. डी. भालेकर विद्यालयाच्या प्रांगणापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी उपमहापौर प्रथमेश गिते, माजी महापौर गुरुमित बग्गा, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक वत्सला खैरे यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. स्वागत नाशिक जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी केले. त्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे रामकुंडावर समारोप करण्यात आला. या पालखी मिरवणुकीत देवठाण, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, चाटोरी, शिवरे येथील भजनी मंडळे सहभागी झाले होते. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब जोर्वेकर, संजय भालेराव, तुळशीराम मोरे, संजय सावंदे, डॉ. दिलीप मेनकर, सोमनाथ सोनवणे, नंदकुमार सोनवणे, रघुनाथ कुंभार, सुनीता गारे, राधा गायकवाड, सविता सोनवणे, क ल्पना गायकवाड, रूपाली क्षीरसागर आदिंसह समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी अशोक महाराज वैद्य खेडगाव आणि तुकाराम महाराज अंबिले अकोले यांचे संत गोरोबाकाका कुंभार यांच्या जीवनावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: Saint Goroba Kaka Palakhi procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.