ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संत गाडगेबाबा व्याख्यानमाला संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 07:38 PM2019-10-10T19:38:40+5:302019-10-10T19:39:23+5:30

येवला : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बहि:शाल शिक्षण मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला शाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालय येथे संपन्न झाली.

Saint Gadgebaba lectures on behalf of Senior Citizens Association | ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संत गाडगेबाबा व्याख्यानमाला संपन्न

व्याख्यानमालेत बोलताना शुभांगी सुतवणे समवेत मंचावर उपस्थित मान्यवर.

Next
ठळक मुद्देभारतातील अनेक दुर्गांचे ऐतिहासिक सांस्कृतिक आर्थिक महत्व आहे

येवला : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बहि:शाल शिक्षण मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला शाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालय येथे संपन्न झाली.
श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ व स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहकार्याने झालेल्या या व्याख्यानमालेत प्रथम व्याख्यान डॉ. जी. बी. शहा यांचे दुर्गांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी दुर्गांची निर्मिती कशी झाली या विषयी अनेक ऐतिहासिक संदर्भ दिलेत. मुरु ड जंजिरा, रामशेज, अनकाई आदी किल्यांचे अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले तसेच भारतातील अनेक दुर्गांचे ऐतिहासिक सांस्कृतिक आर्थिक महत्व आहे अशा दुर्गाना ज्येष्ठ नागरिकांनी भेटी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
दुसरे व्याख्यान शुभांगी सुतवणे यांच राष्ट्र पुरु ष समर्थ रामदास या विषयावर झाले. त्यांनी सर्व संतांचे कार्य हे लोक सेवा भावनेतुन कसे झाले या विषयी मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामी हे उत्तम मानवी मनाचे अभ्यासक होते. म्हणुन त्यांच्या मनाचे श्लोक ह्या रचनेत त्यांनी मानवी मनाच्या आंतरिक शुद्धी, समृद्धी, साठी नीती वचने सांगितली आहेत.
तिसरे व्याख्यान डॉ. बापूराव देसाई यांचे आपली संस्कृती जगातील प्रथम क्र मांकाची या विषयावर झाले. त्यांनी खान्देशी संस्कृती व अहिराणी भाषा जगात कशी वैविध्य पूर्ण आहे या विषयी अनेक उदाहरण दिलेत.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. जेष्टाची समाजातील भूमिका एक मार्गदर्शक म्हणुन असावी त्यांच्या अनुभवाचा, विचारांचा लाभ समाजाला मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन, अतिथी परिचय व आभार केंद्र संचालक प्रा. कैलास बच्छाव यांनी केले. या व्याख्यानमा यशस्वीतेसाठी रावसाहेब दाभाडे, दिगंबर कुलकर्णी, शिंदे, निकुंभ, डॉ. नवनाथ तुपे, प्राचार्य भाऊसाहेब गमे, प्रा. शिवाजी गायकवाड, डॉ. जी. डी. खरात, डॉ. जी. जे. भामरे, एस. पी. बच्छाव, सोमा कुवर, जाधव आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Saint Gadgebaba lectures on behalf of Senior Citizens Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक