साईनाथनगर चौफुलीलगत गटारीचे पाणी रस्त्यावर
By Admin | Updated: June 1, 2016 22:33 IST2016-06-01T22:28:52+5:302016-06-01T22:33:27+5:30
साईनाथनगर चौफुलीलगत गटारीचे पाणी रस्त्यावर

साईनाथनगर चौफुलीलगत गटारीचे पाणी रस्त्यावर
इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या अमृतवर्षा कॉलनीसमोर भूमिगत गटारीचे चेंबर तुंबल्याने वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत होते. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना नाक दाबून मार्गक्रमण करावे लागत आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या अमृतवर्षा कॉलनीसमोर गेल्या दोन दिवसांपासून भूमिगत गटारीचे चेंबर तुंबल्याने शेकडो लिटर घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून दुतर्फा वाहत शिवाजीवाडीपर्यंत गेले. तसेच काही दुकानदार आणि नागरिकांच्या घरात सदर पाणी शिरले.
रस्त्यावर दुर्गंधी पसरल्याने मार्गक्रमण करणे त्रासदायक ठरत आहे. दोन दिवस उलटूनही मनपा प्रशासन आणि हाकेच्या अंतरावरच प्रभागाचे नगरसेवक यांचे निवासस्थान आणि संपर्क कार्यालय असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्वरित कारवाईची मागणी होत आहे.साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्यावरून तुंबलेल्या गटारीचे पाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.