भगूर येथून साई पालखी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 22:35 IST2015-12-28T22:33:09+5:302015-12-28T22:35:42+5:30

भगूर येथून साई पालखी रवाना

Sai Palkhi leaves from Bhagwan | भगूर येथून साई पालखी रवाना

भगूर येथून साई पालखी रवाना

देवळाली कॅम्प : भगूर रेणुका माता मंदिर येथून ओम साईराम मित्रमंडळाची श्री साई पदयात्रा पालखी रवाना झाली.
गेल्या सात वर्षांपासून ओम साईराम मंडळातर्फे भगूर रेणुका माता देवी मंदिर ते शिर्डी श्री साई पदयात्रा पालखी काढण्यात येते. श्री रेणुका माता मंदिर येथून सोमवारी सकाळी आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते मंदिरात पालखीची महाआरती करण्यात आली.
यावेळी तानाजी भोर, उषा भोर, अ‍ॅड. बाळासाहेब आडके, उत्तम कासार, संजय गोडसे, चंद्रकांत गोडसे, प्रमोद मोजाड, विलास गुरूळे, उदय देशमुख, सागर वाजे, संजय आडके आदि मान्यवरांच्या हस्ते पदयात्रेत सहभागी झालेल्या साई भक्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास पाटील, दिनेश गोविल, गोपाळ कोकाटे, प्रशांत वराडे, इजाज पटेल, मंगेश परदेशी, राजू गुरूळे, कैलास आडके आदि उपस्थित होते. पदयात्रेत सहभागी झालेले अलंकार आॅर्केस्ट्राचे श्रीराम, हनुमानाच्या वेशातील कलाकार आकर्षण ठरले होते. (वार्ताहर)

Web Title: Sai Palkhi leaves from Bhagwan