महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा सई नंदुरकरला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 15:29 IST2019-07-23T15:29:12+5:302019-07-23T15:29:26+5:30
नाशिक :- पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नंदुरकरने सिद्धी जाधवच्या जोडीने खेळतांना अंतिम लढतीत रमशा फारु की आणि सनश्री ढमढेरे याचा पराभव करून १९ वर्षे वयोगटाचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा सई नंदुरकरला विजेतेपद
नाशिक :- पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नंदुरकरने सिद्धी जाधवच्या जोडीने खेळतांना अंतिम लढतीत रमशा फारु की आणि सनश्री ढमढेरे याचा पराभव करून १९ वर्षे वयोगटाचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
सई आणि सिद्धी या जोडीने उपउपांत्यपूर्व लढतीत इशा सोनसळे आणि मधुरा पटवर्धन यांचा . तर उपांत्यपूर्व फेरीत भार्गवी रंभाड आणि चैताली नायसे याचा पराभव करून उपांत्य अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत या जोडीने ऋचा सावंत आणि रिया हब्बू यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सई आ िण सिद्धी यांची अंतिम लढतीत उत्तम खेळाचे प्रदर्शनकरून हा सामना जिंकला.
सईच्या या यशाबद्दल शिवसत्य क्र ीडा मंडळाच्या हिमगौरी आहेर, अनंत जोशी, राधेश्याम मुंदडा, योगेश एकबोटे, नरेंद्र छाजेड, आंनंद खरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.
फोटो :- पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत वितेजेपदाचा चषक स्वीकारतांना साई नांदुरकर आणि सिद्धी जाधव. (23स्पोेर्ट्ससइनांदूरकर)