नाशिक-पेठ रस्त्यावरील अपघातात साईभक्त ठार
By Admin | Updated: November 17, 2015 23:03 IST2015-11-17T23:02:50+5:302015-11-17T23:03:33+5:30
नाशिक-पेठ रस्त्यावरील अपघातात साईभक्त ठार

नाशिक-पेठ रस्त्यावरील अपघातात साईभक्त ठार
दिंडोरी : तालुक्यातील चाचडगाव शिवारात नाशिक-पेठ रस्त्यावर मंगळवारी (दि.१७) पहाटे झालेल्या अपघातात एकजण ठार, तर दोन जण जखमी झाले. गुजरातमधील बडोदा येथील साईभक्त शिर्डी येथे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-पेठ रस्त्यावरून पायी दिडींने जात होते.
यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्यातील तीन साईभक्तांना मागून धडक दिल्याने त्यात संजयभाई मुकेशभाई वादी (२०) जागीच ठार झाले.
तर अरु णभाई धनाभाई वादी व जयेशभाई बुधाभाई वादी (रा. वान्सारा, बडोदा) हे दोन गंभीर जखमी
झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दिंडोरी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)