पांगरी येथे साईबाबामूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 00:23 IST2016-04-15T00:06:13+5:302016-04-15T00:23:55+5:30
पांगरी येथे साईबाबामूर्तीची प्राणप्रतिष्ठा

पांगरी येथे साईबाबामूर्तीची प्राणप्रतिष्ठा
पांगरी : येथे श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
ओम साईराम भक्तपरिवाराच्या पुढाकाराने गाव व परिसरातून सुमारे ३० लाख रुपये लोकवर्गणी जमा करून भव्य व आकर्षक श्री साईबाबांचे मंदिर बांधण्यात आले आहे.
या मंदिरात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले. रविवारी पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता देवतापूजन करण्यात आले.
१० वाजता श्री साईबाबा मूर्तीची सवाद्य मिरवणूक व नगरप्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी आबालवृद्धांसह भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री ९ वाजता ह.भ.प. जालिंदर महाराज शिंदे अचलगावकर यांचे कीर्तन झाले.
मंगळवारी सकाळी ७ वाजता देवतापूजन, होमहवन व पूर्णाहुती आदि कार्यक्रम पार पडले. सकाळी
९ वाजता ह.भ.प. विकास महाराज गायकवाड (रुईकर) यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री ९ वाजता साई भजन संध्येचा कार्यक्रम झाला. (वार्ताहर)