शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

काजव्यांच्या प्रकाशात उजळणार सह्याद्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:19 IST

सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे.

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे. काजवारूपी प्रकाशफुलांच्या आविष्कारासाठी हे अभयारण्य राज्यात प्रसिद्ध आहे. चालू महिन्याच्या पंधरवड्यानंतर हा आविष्कार अभयारण्यातील वृक्षसंपदेवर बघावयास मिळणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना याचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.  वैशाख सरू झाला की या अभयारण्यामधील भंडारदरा ते राजूरपर्यंतच्या परिसरातील वातावरण बदलू लागते अन् मग निसर्गप्रेमींना चाहूल लागते ती सह्याद्रीच्या गिरिकंदात झगमणाऱ्या काजव्यांच्या दुनियेचे. वैशाखनंतर काजव्यांच्या उत्पत्तीचा काळ जवळ येतो. रोहिणी, मृग नक्षत्रामध्ये काजवे चमकू लागतात. अहमदनगरच्या अकोले तालुक्यामधील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील घाटघर-साम्रद व भंडारदरा-रतनवाडी या मार्गांवर काजव्यांची दुनिया पाहावयास मिळते. हा परिसर इगतपुरी व नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे मुंबईकर, नाशिककर तसेच पुणेकरांनाही संगमनेर-राजूरमार्गे हे अभयारण्य सोयिस्कर पडते. रोहिणी किंवा मृगाच्या सरी बरसल्या की जणू नभोमंडळातील तारकादळेच अभयारण्याच्या कुशीत उतरल्याचा भास होतो. चहुबाजूला विविध प्रजातीच्या झाडांवर काळ्याकुट्ट अंधारात काजव्यारूपी प्रकाशफुलांचा लखलखाट पाहावयास मिळतो. निसर्गाची ही अद्भुत किमया केवळ डोळ्यांच्या कॅमेºयात टिपता येते आणि या प्रकाशफुलांनी उजळलेले झाड डोळ्यांनी न्याहाळण्याची मजा काही औरच असते. दरवर्षी अभयारण्यात ही दुनिया अनुभवण्यासाठी महिनाभर निसर्गप्रेमींची वर्दळ पाहावयास मिळते. मुंबईकरांसह नाशिककर, पुणेकर व नगरकर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या भागातील आदिवासी लोकांना रोजगारदेखील काही प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होते. लक्ष-लक्ष काजव्यांचा नैसर्गिक आविष्कार डोळ्यांची पारणे फेडणारा ठरतो; मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांचे डोळे जणू हा आविष्कार बघून विस्फारतात की काय, अशी शंका येते. अशा विकृतांकडून असा अद्भुत नजारा अनुभवला तर जात नाही मात्र तो नजारा बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी अशा विकृ त प्रवृत्तीच्या लोकांवर नाशिक वन्यजीव विभागाचा ‘वॉच’ राहणार आहे. ग्रामस्थ व गाइडच्या मदतीने वनविभाग पर्यटकांच्या धिंगाण्याला चाप लावणार आहे.पायी भ्रमंतीला प्राधान्य द्यावेचारचाकी किंवा दुचाकीवर फेरफ टका मारून काजव्यांच्या दुनियेचा आनंद घेता येतो हा गैरसमज निसर्गप्रेमींनी प्रथमत: दूर करायला हवा. वन्यजीव विभागाने निश्चित केलेल्या वाहनतळामध्ये शिस्तीने वाहने उभी करून पायी भ्रमंती करत काजव्यांनी लखलखलेली झाडे बघण्याची मजा लुटावी, असे आवाहन भंडारदरा, अकोले विभागातील निसर्गप्रेमींसह नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी केले आहे.

टॅग्स :forestजंगल