सहाणे यांना तरुण उद्योजक पुरस्कार
By Admin | Updated: April 16, 2016 22:44 IST2016-04-16T22:23:18+5:302016-04-16T22:44:45+5:30
सहाणे यांना तरुण उद्योजक पुरस्कार

सहाणे यांना तरुण उद्योजक पुरस्कार
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पारंपरिक
शेती व्यवसायातून काढता पाय घेत दुष्काळी परिस्थितीचा सामना
करीत दुग्धव्यवसायात पदार्पण
करून व्यावसायिक आदर्श उभा केला आहे.
शेतकरी व व्यवसाय यांचे परस्परपूरक आर्थिक हित जोपासायचे असेल तर अत्यंत पारदर्शी कारभार करत शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिलाच पाहिजे यावर या तरुणाने भर दिला. अत्याधुनिक पद्धतीची बल्क कुलर यंत्रणा बसविली. सुरुवातीला एक हजार लिटरपासूनची दुधाची उपलब्धता आजच्या घडीला पाच हजार लिटर प्रतिदिन पोहोचली आहे. दुग्धोत्पादक शेतकऱ्याना त्यांच्या दुधाची फॅट अतिशय पारदर्शक पद्धतीने बघायला मिळते व भावही इतर दूध डेअरीपेक्षा चांगला दिला जातो.
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील योगेश सहाणे याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने यशस्वी तरुण दुग्धव्यावसायिक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (वार्ताहर)