सफाई कर्मचारी आयोग उद्या नाशकात
By Admin | Updated: April 1, 2017 20:22 IST2017-04-01T20:22:02+5:302017-04-01T20:22:02+5:30
राज्याचा सफाई कर्मचारी आयोग येत्या सोमवारी (दि.३) नाशिकमध्ये येत आहे.

सफाई कर्मचारी आयोग उद्या नाशकात
नाशिक : राज्याचा सफाई कर्मचारी आयोग येत्या सोमवारी (दि.३) नाशिकमध्ये येत असून, दुपारी ३ वाजता महापालिकेत सफाई कामगारांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेण्यात येणार आहे.
सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामोजी पवार यांच्यासह सदस्य नाशिकला येणार आहेत. यावेळी महापालिकेत होणाऱ्या बैठकीत सफाई कामगारांना लाड कमिटीच्या शिफारसी लागू केल्या किंवा नाही, त्यांचे वेतन वेळेवर होते की नाही, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, घरकुल योजना याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.