सादरे प्रकरणाचा तपास संथगतीने
By Admin | Updated: December 7, 2015 23:00 IST2015-12-07T22:59:18+5:302015-12-07T23:00:48+5:30
सादरे प्रकरणाचा तपास संथगतीने

सादरे प्रकरणाचा तपास संथगतीने
?
नाशिक : जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्त्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची कोल्हापूरला झालेली बदली व नूतन अधीक्षक श्रीमती साहू या अद्याप हजर न झाल्याने सीआयडीचा तपास संथगतीने सुरू असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे़
जळगावचे निलंबित
पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्त्येपूर्वी वरिष्ठ अधिकारी व वाळू ठेकेदाराच्या जाचाला
कंटाळून आत्महत्त्या करीत
असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जळगावचे पोलीस अधीक्षक
डॉ़ जालिंदर सुपेकर, स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, वाळू ठेकेदार सागर चौधरी विरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
मुंबई उच्च न्यायालयाने वाळू ठेकेदार सागर चौधरी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे़
या निर्णयाविरोधात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार असून, त्यासाठीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे़ त्यातच सीआयडीचे पोलीस अधीक्षकांची कोल्हापूरला झालेली बदली व नूतन अधीक्षकही अद्याप रुजू न झाल्याने या गुन्ह्याचा तपास संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)