शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्या साधू-महंतांची मागणी; महापालिकेत प्रशासनाबरोबर पहिलीच बैठक

By सुयोग जोशी | Updated: March 24, 2025 20:20 IST

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते.

नाशिक (सुयोग जोशी) : राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात येणाऱ्या सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्यावे तसेच साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी साधू महंतांनी प्रशासनाबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकीत केली.यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते. आखाड्यांच्या वतीने महंत भक्तीचरण दास महाराज, महंत सुधीरदास महाराज, फलहारी बाबा महाराज, अनिकेत शास्त्री यांच्यासह ७० पेक्षा अधिक साधू-महंत उपस्थित होते.

यावेळी साधू महंतांनी आखाड्यांना योग्य जागा मिळावी, सर्व आखाडे, खालसे प्रमुख आणि सार्वजनिक संस्थांना या पूर्वीचा गर्दीचा अभ्यास करून नियमानुसार जागा उपलब्ध करून द्याव्यात, गोदावरी नदीतील गाळ काढून पात्र स्वच्छ करणे, जेणेकरून भाविकांना शुद्ध तीर्थ मिळू शकेल, शहरातील सर्व मंदिर परिसर व कुंभमेळाच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पार्किंगची योग्य व्यवस्था करणे, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दीचा अनुभव घेऊन, नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये योग्य नियोजन करावे, "शाही स्नान"ऐवजी "अमृत स्नान" या शब्दप्रयोगाचा वापर करावा, ज्यामुळे कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व जगभर पसरेल अशा मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधूंच्या मागण्यांना प्राधान्य देऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही या बैठकीत दिली.