‘संदल-ए-खास’निमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:58 IST2017-09-08T00:58:20+5:302017-09-08T00:58:41+5:30
‘सादिक तेरे रोजे पर क्या क्या नजर आता हैं...,’ ‘था नासिक में बातील अंधेरो को डेरा, वो तैबा से आयें लेकर सवेरा...’, ‘ये खुशनसिबी हैं तेरी शहरे नासिक, तुझे शाह सादिक की अजमत मिली हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस स्तुतीकाव्यांचे (मनकबत) पठण करीत शेकडो समाज बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला. बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता.

‘संदल-ए-खास’निमित्त मिरवणूक
नाशिक : ‘सादिक तेरे रोजे पर क्या क्या नजर आता हैं...,’ ‘था नासिक में बातील अंधेरो को डेरा, वो तैबा से आयें लेकर सवेरा...’, ‘ये खुशनसिबी हैं तेरी शहरे नासिक, तुझे शाह सादिक की अजमत मिली हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस स्तुतीकाव्यांचे (मनकबत) पठण करीत शेकडो समाज बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला. बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता.
निमित्त होते, जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’चे. गुरुवारी (दि.७) संध्याकाळी जुने नाशिकमधून ‘जुलूस-ए-हुसेनी’च्या मिरवणुकीचे चौकमंडई येथील बज्मे गरीब नवाज मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी मिरवणुकीच्या प्रारंभी फातिहा पठण करत संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या संरक्षण व शांततेसाठी प्रार्थना केली. खतीब यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी हुसेनी युवक मंडळाच्या वतीने बडी दर्गाच्या प्रांगणात महाप्रसादाचे (लंगर) वाटप करण्यात आले. त्यानंतर दर्गा येथे विशेष १६वी शबनिमित्त धार्मिक मैफल संपन्न झाली.