शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:20 IST

सतत ढगाळ वातावरण... पावसाची धास्ती... द्राक्षबागेवर भुरी... कांद्यावर धुई...आदींसह विविध शेतीशी निगडित समस्यांमुळे येवला तालुक्यातील शेतकरी झाले आहेत.

ठळक मुद्देरब्बी हंगाम धोक्यात : गहू, कांदे, हरबरा, द्राक्षांवर रोगांचा प्रादुर्भाव

मानोरी : सतत ढगाळ वातावरण... पावसाची धास्ती... द्राक्षबागेवर भुरी... कांद्यावर धुई...आदींसह विविध शेतीशी निगडित समस्यांमुळे येवला तालुक्यातील शेतकरी झाले आहेत.मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड, देशमाने आदी भागात चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याने रब्बी हंगामातील गहू, कांदे, हरबरा पिकांसह द्राक्षबागांवर आलेल्या मावा, भुरी यांसारख्या रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. रोगांवर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करून पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.येवला तालुक्यात आधीच ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणाºया दाट धुक्याने शेतकरी चिंतेत पडला असताना पिके वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढला आहे. तर हवेत गारवा निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिके रोेगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत असल्याने सर्वसामान्य शेतकरी धास्तावला असल्याचे दिसून येत आहेत.यंदाचा खरीप हंगाम आधीच शेतकºयांना डोकेदुखी, खर्चिक आणि आर्थिक गणित कोलमडणारा ठरला असून, मक्यावर आलेल्या लष्करी अळीवर नियंत्रण आणण्यासाठी असताना खरीप हंगामातील मका, सोयाबीन आदी पिके पावसाने खराब तर काही ठिकाणी सडून गेल्याने पिकांना झालेला खर्चदेखील या पिकातून फिटला नव्हता, मात्र समाधानकारक पडलेल्या पावसामुळे शेतकºयांना रब्बीच्या पिकांची तयारी मोठ्या जोमात केली होती. उधार-उसनवारी घेऊन बी-बियाणे पेरले होते. गहू, हरबरा, कांदे लागवड केली असून, अद्यापही काही ठिकाणी गव्हाच्या पेरण्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहे अशा ठिकाणी गहू जमिनीतून डोकावण्यास सुरुवात झाली असून, वातावरणात सातत्याने बदल होत असून, आणि पहाटेच्या धुक्याने द्राक्षबाग, कांदे व गव्हाच्या पिकांवर माव्याचा प्रादुर्भावहोत असल्याने शेतकरी पुन्हा कीटकनाशक फवारणी करण्यात व्यस्त झाले आहेत.आठ दिवसांपासून गव्हाला प्रतिएकर सुमारे दोन हजार रुपये तर कांद्याला दोनदा कीटकनाशक औषध फवारणी केली असून, प्रतिएकर औषध फवारणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपये इतका खर्च झाला आहे. मागील वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे येवला तालुक्यात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते, मात्र यंदा समाधानकारक पडलेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरण्यामध्ये वाढ झाली असून, अनेक ठिकाणी गव्हाला दोनदा पाणी भरल्याचे दिसून आले आहे.सकाळपासूनच आकाशात ढग जमा होत असल्याने येवला तालुक्यातील शेतकºयांना अवकाळी पावसाची धास्ती डोळ्यासमोर उभी राहिली आहे. द्राक्ष बागायतदारासाठी हे ढगाळ वातावरण डोकेदुखी ठरत असल्याने द्राक्षबागेवर सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे कृषी दुकानदारांना ‘अच्छे दिन’ आले असल्याचे दिसून येत असून कीटकनाशक औषध खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच कृषी दुकानात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.कांद्याचे दर टिकून असल्याने दिलासाकांद्याच्या लालीने शेतकºयांना यंदा मालामाल केले असून, कांद्याचे दर मागील काही महिन्यांपासून चांगल्या प्रकारे टिकून असल्याने उन्हाळ कांदा लागवडीकडे शेतकºयांनी जास्त प्रमाणात कल दिला आहे. कांदा पिकातून चांगले दर मिळत असल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळत आहे.कांदा रोपे खरेदीला उधाणअवकाळी पावसाने रोपांचे तीन ते चार वेळेस नुकसान केले असून, अनेक ठिकाणी रोपे सडून गेली असली तरी कांदा दर टिकून असल्याने कांदा लागवडीकडे जास्त भर शेतकरी देताना दिसत आहेत. मात्र, रोपांचे दर गगनाला भिडले असून, मिळेल त्या किमतीत कांद्याची रोपे शेतकरी खरेदीकरून कांदा लागवड करीत आहेत.मजूरटंचाईमुळे खर्च वाढलाकांदा लागवडीसाठी सध्यामजूरवर्गाची मोठी वानवाभासत असून कांदे लागवडीसाठी मजुरांची शोधाशोध करण्याची देखील वेळ शेतकºयांवर आली आहे. मजूरटंचाईमुळे कांद्याच्या प्रतिएकर लागवडीसाठी आठ हजार रु पये उच्चांकी दर मजूर मागत आहे. त्यात दुसºया ठिकाणाहून मजूर उपलब्ध करण्यासाठी वाहतूक खर्चदेखील शेतकºयांच्या माथी मारण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी