भगूरला हगणदारीमुक्तीचा पुरस्कार

By Admin | Updated: October 4, 2015 23:54 IST2015-10-04T23:51:47+5:302015-10-04T23:54:20+5:30

भगूरला हगणदारीमुक्तीचा पुरस्कार

Sacrifice award to Bhagur | भगूरला हगणदारीमुक्तीचा पुरस्कार

भगूरला हगणदारीमुक्तीचा पुरस्कार

भगूर : महाराष्ट्र राज्य शासनामार्फत दिला जाणारा हगणदारीमुक्त शहराचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भगूर शहराला प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मलबार हील, मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष अनिता करंजकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, तर व्यासपीठावर मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, नगरसचिव मनीषा म्हैसकर आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक संजय शिंदे, अंबादास कस्तुरे, रामनाथ कासट, संजय पवार, आर. डी. साळवे, सौ. प्रतिभा घुमरे, सौ. स्मीता गणोरे, सौ. स्वाती गणोरे, सौ. शैलेजा कापसे आदि नगरसेवकांसह मुख्य लिपिक लक्ष्मण टोपले, अभियंता जगदीश पाटील, नीलेश बावीस्कर, मोहन गायकवाड, मंदाबाई लकारिया आदि यावेळी उपस्थित होते. यापूर्वीही शासनातर्फे पालिकेला दोनदा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: Sacrifice award to Bhagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.