पखालरोडवर साचला तलाव
By Admin | Updated: August 1, 2016 01:06 IST2016-08-01T01:05:26+5:302016-08-01T01:06:08+5:30
अपघातांना निमंत्रण : चिखलाचे साम्राज्य; पालिकेचे दुर्लक्ष

पखालरोडवर साचला तलाव
वडाळागाव : अशोका युनिव्हर्सल शाळेसमोरून डीजीपीनगर कालव्याच्या रस्त्याला जोडणाऱ्या पखालरोडवर पावसाचे पाणी साचत आहे. सखल भाग असल्याने पाणी नैसर्गिक नाल्यात न जाता याच ठिकाणी जमा होत असून, रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे येथून मार्गक्रमण करताना नागरिकांची कसरत होत आहे.
रविवारी मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत सुरू असलेल्या संततधारेने मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. रस्त्याचे डांबरीकरण करताना या ठिकाणी खोलगट भाग निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी येथे साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी किंवा पूर्व विभागाच्या बांधकाम कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या या सखल भागावर निर्माण झालेला चिखलही स्वच्छ केला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. (प्रतिनिधी)