शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

साबरमती के संत तुने कर दिया कमाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:58 IST

१५ आॅगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), २ आॅक्टोबर (गांधी जयंती), ३० जानेवारी (गांधी पुण्यतिथी) या दिवशी अनेक संस्थांतर्फे ...

१५ आॅगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), २ आॅक्टोबर (गांधी जयंती), ३० जानेवारी (गांधी पुण्यतिथी) या दिवशी अनेक संस्थांतर्फे ठिकठिकाणी देशभक्तीपर गाणी लावली जातात़ नैमित्तीक मेजवानी मिळते़ या गाण्यांमध्ये एक लक्षवेधी गाणे हमखास असते ते म्हणजे देदी हमे आझादी बिना खडग धिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, हे गाणे ऐकल्यावर मनमंथनात महात्मा गांधींची प्रतिमा व त्यांचे चरित्र समोर येते़ कोणत्याही युद्धाशिवाय, अहिंसा, सत्याग्रह व उपोषणाच्या मार्गाने त्यांनी आपल्या देशाला आझादी मिळवून दिली, त्यांच्या या ‘कमाल’ची जगभर नोंद घेण्यात आली़ गांधीजी विश्वविख्यात झाले़ गांधीजींची ही कमाल केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरती सिमीत नसून त्यांनी अनेक क्षेत्रात कमाल असेच कार्य केले आहे़ त्यात स्वातंत्र्य लढ्याला पहिल्या क्रमांकाचे स्थान आहे तर निसर्गोपचार क्षेत्रातील कमाल दुसºया क्रमांकावर आहे़ विद्यमान केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे १८ नोव्हेंबर हा दिवस प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे़ त्यानिमित्ताने हा प्रासंगिक लेखन प्रपंच लेख अधिक जिवंत व्हावा म्हणून काही ठिकाणी इंग्रजी शब्दप्रयोग जसेच्या तसे केले आहेत.

१८ नोव्हेंबर १९४५ साली गांधीजींनी पुणे येथे आॅल इंडिया नेचर फाउंडेशन ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन केला़या ट्रस्टवर गांधीजी, डॉ़ दिनशा मेहता, जहाँगीर पटेल यांच्या स्वाक्षºया आहेत़ सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ़ सुशीला नय्यर यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे़ यापूर्वी २ आॅक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवसच प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून साजरा करण्यात येत होता, परंतु २ आॅक्टोबर हा दिवस अहिंसा दिवस व अन्य उपक्रमानेही साजरा होतो़ निसर्गोपचाराचा वेगळेपणा जोपासला जावा म्हणून १८ नोव्हेंबर २०१८ पासून हा दिवस प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून साजरा होईल़ नव्हेतर भारतातून लुप्त झालेला निसर्गोपचार गांधीजींनी पुनरुज्जीवित केला.

एवढेच नव्हेतर तो अधिक समृद्धही केला़ सन १९०० च्या सुमारास काही दिवस गांधीजींचे वास्तत्व दक्षिण आफ्रिकेत होते़ गांधीजी संशोधक, वैज्ञानिक, प्रयोगशील, अभ्यासक असे अनेक पैलूंचे व्यक्तिमत्त्व होते़ त्यांचे काही प्रयोग थरारक होते़ दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याप्रसंगी गांधीजी पचनसंस्थेच्या विकाराने ग्रस्त असत़ त्यासाठी त्यांनी सुरुवातीला औषधोपचार करून घेतला़ त्यावेळी गांधीजीच्या लक्षात तीन बाबी आल्या. 

औषधोपचार खूप खर्चिक असून तो आपल्या देशातील गरीब जनतेला परवडणारा नाही. दुसरे म्हणजे औषधोपचार लक्षणावर काम करते़ रोगांच्या मुळाशी जात नाही त्यामुळे रोग व संगोपचार हे चक्र सारखे चालूच राहते़ तिसरे म्हणजे औषधांचे दुष्परिणाम, गांधीजींनी पर्यायी चिकित्सेचा शोध घेण्यास सुरुवात केली़ काही काळाने अनेक पुस्तके वाचल्यानंतर त्यांना निसर्गोपचार गवसला़ यात जलचिकित्सा, मातीचिकित्सा याची माहिती शिवाय प्रयोग होते़ गांधीजींनी या चिकित्सांचा पहिला प्रयोग त्यांचा दहा वर्षांचा मुलगा मणिलाल याच्यावर केला़ मणिलाल टायफाईड व न्यूमोनियाने आजारी होता़ उपवास, रसाहार, पाण्याच्या पट्ट्या, मातीच्या पट्ट्या असे प्रयोग केले अन् मणिलाल बरा झाला. रोगमुक्त राहण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी उपवासाचा महिमा त्यांनी प्रयोगातून सिद्ध केला़ नंतरच्या काळात हा उपवास महिमाच त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे एक शस्त्र झाले़ गांधीजींनी अनेकवेळा उपोषणे केलीत त्याच्या मुळात हा उपवास महिमा आहे़ दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजींनी पूर्णपणे स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले़ अहमदाबाद येथे साबरमती आश्रमाची स्थापना केली़ नंतर सेवाग्राम आश्रम स्थापन केले़ दोन्हीही ठिकाणी गांधीजी स्वत:ला रुग्णांची तपासणी करून त्यांची चिकित्सा करत़ पुणे येथील डॉ. दिनशा मेहता यांच्या नेचर क्युअर क्लिनिकमध्ये ते स्वत: चिकित्सा करून घेण्यासाठी येत़ त्यातूनच या लेखाच्या सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे १८ नोव्हेंबर १९४५ ला आॅल इंडिया ट्रस्टची स्थापना केली़ यावेळी दोन महिने गांधीजींचे या क्लिनिकमध्ये वास्तत्व होते़

या दरम्यान, निसर्गोपचार आश्रम स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला़ त्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला आणि उरळीकांचन येथील जागेची निवड करण्यात आली़ २२ मार्च ते ३० मार्च १९४६ दरम्यान गांधीजींचे उरळीकांचन येथे वास्तत्व होते आणि या दरम्यानच त्यांनी तेथे निसर्गोपचार आश्रमाची स्थापना केली़ स्थापना सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना गांधीजी म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मी माझे आयुष्य निसर्गोपचाराच्या प्रचार-प्रसारासाठी वाहून घेईऩ निसर्गोपचार खेड्यापाड्यात, घराघरात पोहोचला पाहिजे परंतु दुर्दैवाने त्यांची ३० जानेवारी १९४८ साली हत्या झाली़ त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले़ गांधीजींनी त्यांच्या आत्मकथेत असा दावा केला आहे की, एक हजार रुग्णांपैकी ९९९ रुग्ण निसर्गोपचाराने बरे होऊ शकतात़ दुसरा त्यांचा दावा असा होता की, मी १२५ वर्षे जगेन त्यांचे हे दावे त्यांच्या प्रयोगावर आधारित होते असेही नमूद आहे़- चंदुभाई देढीया(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरMahatma Gandhiमहात्मा गांधीMahatma Gandhi Hindi Vishwa Vidyalayaमहात्मा गांधी हिंदी विश्व विद्यालय