लॉन टेनिस स्पर्धेत साबळे उपविजेता

By Admin | Updated: June 10, 2014 22:42 IST2014-06-09T23:25:53+5:302014-06-10T22:42:45+5:30

नाशिक : पुण्यात संपन्न झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत येथील सिद्धार्थ अनील साबळे याने उपविजेतेपद मिळविले आहे

Sabale runner-up in lawn tennis tournament | लॉन टेनिस स्पर्धेत साबळे उपविजेता

लॉन टेनिस स्पर्धेत साबळे उपविजेता


नाशिक : पुण्यात संपन्न झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत येथील सिद्धार्थ अनील साबळे याने उपविजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून त्याने उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीत संस्कार चोबे याचा त्याने पराभव केला. अंतिम फेरीत केरळच्या त्रिभुवण रेड्डी याने सिद्धार्थची विजयी घोडदौड थांबविली आणि त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या यशामुळे त्याला राष्ट्रीय १२ गुण मिळाले. नाशिक जिमखान्यात प्रशिक्षक राकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ नियमित सराव करतो.

Web Title: Sabale runner-up in lawn tennis tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.