शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेसाठी तहसीलदारांना सर्वपक्षीय साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:17 IST

पुनंद पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन दिले आहे.

सटाणा : पुनंद पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन दिले आहे.सटाणा शहराचा पाणीप्रश्न लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी शहरासाठी केळझर प्रकल्पातून स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचे काम सुरू करण्यात आलेले असताना प्रकल्प क्षेत्रातील नेते आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे ती योजना बारगळली.त्यानंतर सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाण्याचे आरक्षण करण्यात येऊन योजनेच्या निधीला मंजुरी दिली. मात्र पुनंद लाभक्षेत्रातील नेत्यांनी जलवाहिनीच्या कामास विरोध सुरू केल्याने ही योजना ही संकटात सापडली आहे.पुनंद पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन देऊन पुनंद पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नितीन सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नितीन सोनवणे, मंगलसिंग जोहरी, मंगेश भामरे, बापू कर्डवाल, अब्दुल बोहरी, दादा इंगळे, रोशन सोनवणे, राजनसिंग चौधरी, विक्र ांत पाटील, किरण सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी